काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥ भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥ दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥ ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥ दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥ देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥