केली मी चाफ्याची रे
घे प्याला हा भरला मिसळुन लाजेची लाली सरली लज्जा, नीती भीती त्यांतच विरघळली केली मी चाफ्याची रे शय्या ! ना झोप, जांभई आली हो रात दंवाने ओली दरवळे धुंद मोतिया ! पुन्हापुन्हा झुकुनी सुरई प्याल्याचे चुंबन घेई लागली रात झिंगाया ! आपुले गुपित हुडकीत पोचला चांद खिडकीत ओढिते सरपडदा सैय्या !