खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥ जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ सदा जे आर्त अति विकळ जयांना गांजिती सकळ तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ प्रभुची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥