खवळून उठले साती सागर बुडली धरती बुडले अंबर प्रलयानंतर वटपत्रावर पुन्हा संभवे नवीन सृष्टी नको मानवा होऊ कष्टी ! मोडून पडता इवले घरटे दुबळ्या पंखी बळ संचरते काडी काडी चोच जमविते पुन्हा निवारा घरट्यापोटी नको मानवा होऊ कष्टी ! विनाश तेथे पुन्हा निर्मिती जन्म मात करी मरणावरती फिरुनी मानवकुळे नांदती मधुर भविष्ये बघते दृष्टी नको मानवा होऊ कष्टी ! हात राबता तो परमेश्वर संसाराची ओढ अनावर राखेमधुनी उभव पुन्हा घर करी जीवनी अमृतवृष्टी नको मानवा होऊ कष्टी !