खेड्यामधले घर कौलारू (१)
आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू ! हिरवी श्यामल भवती शेती पाऊलवाटा अंगणी मिळती लव फुलवंती, जुई शेवंती शेंदरी अंबा सजे मोहरू ! चौकट तीवर बाल गणपती चौसोपी खण स्वागत करती झोपाळ्यावर अभंग कातर सवे लागती कड्या करकरू ! माजघरातील उजेड मिणमिण वृद्ध कांकणे करिती किणकिण किणकिण ती हळू, ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढ लेकरू !