PrintSource

खेड्यामधले घर कौलारू (२)

Khedyamadhale Ghar (2)

अनिल भारती

आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू

पूर्वदिशेला नदी वाहते
त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येउन मिळते
यौवन लागे उगा बावरू

माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रीती
कणसावरती माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती-पाखरू

आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडविल्या येताजाता
परि आईची आठवण येता
मनी वादळे होती सुरू