खेळ मांडीयेला वाळवंटीं घाईं । नाचती वैष्णव भाईं रे । क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां । टाळ मृदुंग घाईं पुष्पवर्षाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥ वर्णअभिमान विसरली याती । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका ह्मणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥४॥