खुळ्या खुळ्या रे पावसा
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला? नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला ! कसा वाहे गार वारा, अंग सारे थरथरे त्यात तुझा अनावर वरतुनी हात फिरे नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला ! कुठे जाऊ, धाऊ कुठे? आता पुरती भिजले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !