किती पांडुरंगा वाहू
किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार? लक्ष चौर्यायशीची ही नको आता येरझार लोखंडाचे गुणदोष बघे का परीस? लेकराची कासावीस माहीत आईस ! पाण्यामाजी तूच देवा तारिले पाषाण ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन ! काकुळती आलो आता नको बघु अंत कोठे गुंतलासी राया कोणाला ताराया? पंढरीच्या राया तुझ्या दंडवत पाया !