PrintSource

किती वानु तुला मी

Kiti Vanu Tula Mi

अण्णा जोशी

किती वानु तुला मी भगवंता
चिपळ्या एकतारी वाजविता

म्हणतात दयाघन तुज सारे
तू मजवरती रुसला का रे
देवा, थकलो हरीहरी म्हणता

नामामृत माझ्या ओठी तुझे
नाही भजनाविण गीत दुजे
डोळे मिटुनी तुजसी स्मरता

आहेस विधाता जगताचा
कैवारी दीन अनाथांचा
हाकेसरशी तू धाव अता