कोण तुजसम सांग मज
कोण तुजसम सांग मज गुरुराया । कैवारी सदया । पाहिजे तें अंगीं स्वीकाराया । भवदुःख हराया ॥ तूंचि विष्णु, तूंचि शिव, तूं धाता । तूं विश्वंभरता । तूंचि व्यापकव्याप्यातें प्रसवीता । तूं मायेपरता ॥ तूंचि शिष्या पोसणारी माता । तूं विद्यादाता । तूंचि देशी तत्त्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥