कोणास ठाऊक कसा? पण सिनेमात गेला ससा ! सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान, सा नि ध प म ग रे सा रे ग म प दिग्दर्शक म्हणाला, "वाहवा !", ससा म्हणाला, "चहा हवा !" कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा ! सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, "छान छान !", ससा म्हणाला, "काढ पान !" कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा ! सशाने म्हटले पाढे बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले, "शाब्बास !", ससा म्हणाला, "करा पास !"