कुहु कुहु कुहु येई साद
कुहु कुहु कुहु येई साद उधळित वनि स्वरतुषार मधुर हे तराणे, ऋतुराज आज आला ! सुमनांचे रंग रंग ऋतु-रंगित झाले गंधगीत रतिचंचल अवनीवर दरवळले वारा भिरभिर हा तोडी बंध विहगांचे अंतरंग मदमंथर झाले स्वप्नशिल्प कलिकांच्या अधरावर थरथरले सारे स्थिरचर बघ होई धुंद