कुणाच्या खांद्यावर कुणाचें
कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें? कशासाठी उतरावें तंबू ठोकून? कोण मेलें कुणासाठी रक्त ओकून? जगतात येथें कुणी मनांत कुजून ! तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे? दीप सारे जाती येथे विरून, विझून वृक्ष जाती अंधारांत गोठून, झडून. जीवनाशीं घेती पैजा घोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे ! अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी, वेदनांची गाणीं म्हणजे पोकळ समाधी. देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे