अजून जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी कुणी ग बाई मारली कोपरखळी? दिस जत्रंचा होता पहिला, साजासंगं मी शिणगार केला मी बाई भित्री, हरिणी बावरी, नाजूक चंद्रावळी कुणी ग बाई मारली कोपरखळी? हौशी-गवशी-नवशी पोरं, फिरू लागली मागं म्होरं कोण कसा ग डिवचून गेला राधेला वनमाळी कुणी ग बाई मारली कोपरखळी? कळ गेली ग काळीज चिरुनी, काटा आला अंगावरुनी दवापाणी मी करू, कशाची उगळून लावू मुळी? कुणी ग बाई मारली कोपरखळी?