PrintSource

कुणी निंदावे वा वंदावे

Kuni Nindave Va Vandave

अशोक जी. परांजपे

कुणी निंदावे वा वंदावे, फोल पसारा सारा रे
कृष्णरूप जग झाले आता, मी तर वेडी मीरा रे

सदनी असो वा वनात किंवा जळात राहो रणात अथवा
नामघोष तो एकच हृदयी राधाधर हरी-मिलिंद रे

वृंदावन जन गोकुळ गुणीजन, सेवाध्यान तपोधन सारे
इच्छा एकच मनात नांदे ह्रीपावन मन जीवन रे

देहची मंदिर आत्मा गिरिधर, नयन सरोवर तीर्थची रे
मीरेचे प्रभु मोहन श्रीधर, पाप विनाशी नामची रे