कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥ हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला ह्मणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥ एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी तरी सांगा गे ॥४॥