रातीची झोप मज येईना की दिस जाईना जा जा जा कुणीतरी सांगा हो सजणा ! लागली श्रावणझड दारी जिवाला वाटे जडभारी अशी मी राघुविण मैना की झाली दैना जा जा जा कुणीतरी सांगा हो सजणा ! एकली झुरते मी बाई सुकली ग पाण्याविण जाई वाटते पाहु मनमोहना की मन राहिना जा जा जा कुणीतरी सांगा हो सजणा !