Back
Fitting…

1 page

कुरवाळू का सखे मी

कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
झाले तुझी जिथे मी, भय कोणते? कशाचे?

का झाकितेस डोळे, का वेळतेस माना?
गुंफून पाच बोटे का रोखिसी करांना?
माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

वार्‍यावरून येतो मधुगंध मोगर्‍याचा
तो गंध आज झाला निःश्वास भावनांचा
तुज शोभते शुभांगी, चातुर्य संयमाचे

एकान्‍त शांत आहे, दोन्ही मने मिळाली
प्रीती मनामनांची दोघांसही कळाली
जागेपणी सुखावे हे स्वप्‍न प्रेमिकांचे

कुरवाळू का सखे मी

कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
झाले तुझी जिथे मी, भय कोणते? कशाचे?

का झाकितेस डोळे, का वेळतेस माना?
गुंफून पाच बोटे का रोखिसी करांना?
माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

वार्‍यावरून येतो मधुगंध मोगर्‍याचा
तो गंध आज झाला निःश्वास भावनांचा
तुज शोभते शुभांगी, चातुर्य संयमाचे

एकान्‍त शांत आहे, दोन्ही मने मिळाली
प्रीती मनामनांची दोघांसही कळाली
जागेपणी सुखावे हे स्वप्‍न प्रेमिकांचे

कुरवाळू का सखे मी

कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
झाले तुझी जिथे मी, भय कोणते? कशाचे?

का झाकितेस डोळे, का वेळतेस माना?
गुंफून पाच बोटे का रोखिसी करांना?
माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

वार्‍यावरून येतो मधुगंध मोगर्‍याचा
तो गंध आज झाला निःश्वास भावनांचा
तुज शोभते शुभांगी, चातुर्य संयमाचे

एकान्‍त शांत आहे, दोन्ही मने मिळाली
प्रीती मनामनांची दोघांसही कळाली
जागेपणी सुखावे हे स्वप्‍न प्रेमिकांचे