मधु मागशि माझ्या सख्या, परि मधुघटचि रिकामे पडति घरीं ! आजवरी कमळाच्या द्रोणीं मधू पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्विची स्मरोनी करिं न रोष सख्या, दया करीं. नैवेद्याची एकच वाटी अता दुधाची माझ्या गाठीं; देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगीं अंगणीं कशी तरी. तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज, वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज, संसाराचें मर्म हवें तुज, मधु पिळण्या परि बळ न करीं ! ढळला रे ढळला दिन सखया ! संध्याछाया भिवविति हृदया, आता मधुचें नांव कासया? लागले नेत्र हे पैलतिरीं.