मधुवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम एकदा दर्शन दे घनश्याम ! नयनी माझ्या गोकुळ वसले यमुनेचे जळ गाली झरले राधेपरी मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम ! वसंतांतले सरले कूजन तुझ्याविना हे उदास जीवन शोधित तुजला फिरते वणवण, नाहि जीवा विश्राम दासी मीरा ये दाराशी घे गिरिधारी तव हृदयाशी या पायाशी मथुरा-काशी, तीर्थापरी हे नाम !