मागणें हें एक देई भक्ति-प्रेम । देवा तुझें नाम गाईन मी ॥१॥ आवडीनें देवा गुण मी वर्णीन । प्रेमें न्याहाळीन रूप तुझें ॥२॥ भक्ति-भावें तुझे करीन पूजन । अंतरी चिंतन निरंतर ॥३॥ स्वामी म्हणे पायीं ठेवीन मी माथा । तेणें माझ्या चित्ता समाधान ॥४॥