मज गमे ऐसा जनक तो । मांग साचा ॥ मुख सुरकुतलें, मस्तक पिकलें । शरीर रोगांनीं पोखरिलें । स्मशान ज्याने सन्निध केलें । त्या प्रेताला दुहिता विकतो ॥ क्रूराधम हा जनक कशाचा । अप्रत्यभक्षी व्याघ्र मुखाचा । वास नसावा जगीं अशाचा । नवल हेंच यम यास विसरतो ॥