हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो अहंपणाचे तुटता अडसर आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो स्फटिकगृहीच्या दीपापरि मन प्रसन्नतेने ये ओसंडून चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो ध्रुवापरि दृढ ध्येयप्रवणता ऋजु समर्थता कार्यशरणता बहुत शोधुनि हे जीवनस्वर आज उमगले हो