माझा भाव तुझे चरणीं
माझा भाव तुझे चरणीं । तुझें रूप माझे नयनीं ॥१॥ सापडलों एकामेकां । जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥ त्वां मोडिली माझी माया । मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥ त्वां मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयीं ॥४॥ नामा ह्मणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविलें कोणा? ॥५॥