मला आणा एक हिर्याची
माझ्या शेजारी येउन बसता हवंनगं काहीच ना पुसता तुम्ही नुसतेच गालांत हसता नगं फुकाची साखरपेरणी मला आणा एक हिर्याची मोरणी ! नव्या नवतीत पहिलीवहिली पोरपणाची हौस माझी राहिली इतके दिवस वाट म्या पाहिली जीव नुसताच लावलाय झुरणी मला आणा एक हिर्याची मोरणी ! एक सोन्याचं कोंदण घडवा मधी लाखाची हिरकणी जडवा राघुनाकाचा दिमाख वाढवा करून थकले तुमची मनधरणी मला आणा एक हिर्याची मोरणी !