मला इष्काची इंगळी डसली
मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात, नको तिथंच पडला अवचित माझा हात हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली ग बाई मला, इष्काची इंगळी डसली बाई ग, बाई ग मारली किंकाळी, कळ लई आली उरी घामानं भिजली चोळी अंगाअंगाची काहिली झाली सांगा ही कळ कसली सार्या घरात फिरले बाई ग मला औशिद गावलं न्हाई ग तंवर कुणाची चाहूल आली खूण खुणेला पटली ह्या इंगळीचा कळला इंगा खुळ्यावाणी मी घातला पिंगा मंतर घाला हलका हलका नार चुकून फसली