मल्मली तारुण्य माझे
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे ! मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे ! लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की राजसा, माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे ! तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे ! रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी.. मी तुला जागे करावे ! तू मला बिल्गून जावे !