मन हे खुळे कसे- गगनी पाखरू जसे गंधवारा बिलगताना त्यास भुलते कसे आकाशाची गहन निळाई तशी कुणाची ओळख होई एक अनामिक हुरहुर लावी जन्मभरीचे पिसे मेघाआडुनी कुणी बोलवी अमृतजादू करून दाखवी ! व्याकुळतेच्या भाळी केवळ पाण्याचे आरसे ऋतू फुलांच्या गावी येई भ्रमर मिठीचे गाणे गाई माळावरती अता सुरांचे उदासवाणे ठसे