मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना जे परतून कधी ना आले ज्या होत्या रे कळ्या चिमुकल्या खुदकन् आता हसू लागल्या होत्या बाहुल्या इवल्याइवल्या डोळ्यांत आली लज्जा त्यांच्या हे मला कसे ना कळले? श्रावणधारा, वादळवारा झेलिल्या मी उन्हाच्या झळा झिरपत झिरपत उन्हाळ्यामागून आला पावसाळा मन माझे कुणा ना दिसले पाखरे जर दिवस असते आभाळी मी सोडिले नसते धरुनी त्यांना हृदयात मी कोंडुनी ठेविले असते ते पाखरू मागे न वळले