मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥ तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों मी आस धरुनी तुझी ॥४॥