मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ! स्वप्नांतिल पदर धुक्याचा हातास कसा लागावा? मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले मन गरगरते आवर्त मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा? चेहरा-मोहरा ह्याचा कुणी कधी पाहिला नाही धनी अस्तित्वाचा तरीही ह्याच्याविण दुसरा नाही ह्या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा?