मन सुद्ध तुझं गोस्त
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची. झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला रगत निगंल तरि बि हंसल, शाबास त्येची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची. जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बी खाई गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ विजयाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची.