जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावांवरी मनाची फुंकर देह आंधळी कोठडी, बंदिवान झाले श्वास इथे कुणी कोणाची का उगा धरायाची आस वाटा वेगळाल्या वेड्या, वेगळ्या जाणार मानभंग आधि-व्याधी, नाना व्याप-ताप कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप सुखे एकरंगी, दु:खे अनंत अपार अधांतरी विश्वाचाही संसार पोरका ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका तोच बुडवितो, तोच तारूनि नेणार