मनी अचानक हलले काही वार्यावर दरवळले काही भरती येता उधाणलेली लाट आतुनी शहारलेली सावरताना ढळले काही गंध दिवाणा स्पर्श पाहुणा हवा कशाला नवा बहाणा नजरेमधुनी कळले काही तू असण्याचा धुंद केवडा तू नसताना दिवस बापुडा शब्दांमधुनी ओघळले काही हात हाती हा विश्वासाचा अर्थ सांगतो सहवासाचा सखेसोबती आकळले काही