PrintSource

मनीमाऊचं बाळ कसं

Mani Maucha Bal Kasa

शरद मुठे

छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरंगोरंपान

इवलीशी जिवणी नि इवलेसे दात
चुटुचुटु खाती कसा दूध आणि भात
इवले इवले डोळे, इवले इवले कान

इवल्याशा पायामध्ये इवलासा चेंडू
फेकिता मी घ्याया धावे दुडु दुडु दुडू
इवल्याशा शेपटीची झाली कमान

आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ
बाळाची मज्जा सारी दुरुनिया पाहू
आईशी बाळ खेळे विसरुनी भान