मनोगतांचे उंच मनोरे
मनोगतांचे उंच मनोरे सांग कुणी रचिले आज लोचनी संसाराचे स्वप्न मला दिसले ही वळणाची वाट असावी हिरव्या कुरणावरी फुलझाडांवर रोज उडाव्या कारंजाच्या सरी उभे मधोमध एक सानुले घरकुल माझे वसले सखा सोबती जवळ बसावा एकान्ती येउनी अंग चोरुनी दूर उभी मी बावरलेल्या मनी या भेटीच्या आभासाने खुदकन मी हसले या चित्राचे रंग भरावे तूच अपुल्या हाती याच घडीला अशा जुळाव्या अपुल्या रेशीमगाठी माझ्या पुढती इंद्रपुरीचे सुख कोठे, कसले?