मनोरथा चल त्या नगरीला
मनोरथा, चल त्या नगरीला भूलोकीच्या अमरावतीला स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी सडे शिंपिले चंद्रकरांनी शीतळ वारा सारथी होउनि अयोध्येच्या नेई दिशेला ! सर्व सुखांचा मेघ सावळा रघुनंदन मी पाहीन डोळां दोन करांची करुनी मेखला वाहीन माझ्या देवाला !