PrintSource

नाम घेता तुझे गोविंद

Naam Gheta Tujhe Govind

रमेश अणावकर

नाम घेता तुझे गोविंद
मनी वाहे भरुनी आनंद

हृषिकेशी बंन्सिबिहारी
गोकुळीचा कुंजविहारी
कुणी म्हणती कृष्ण-मुरारी
कुणी मिलिंद आणि मुकुंद

विश्वाचा नाथ म्हणोनी
हासते विश्व तव वदनी
तव नामे तुझिया चरणी
नाचते यमुनाजळ धुंद

तू शब्द ओळीओळीत
तू अर्थ मधुर गीतेत
तू ताल भक्तिगीतात
तू सुरासुरांत सुगंध