नाम तुझे घेता देवा
नाम तुझे घेता देवा, होई समाधान तुझ्या पदी लागो माझे, तन-मन-ध्यान सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान मिळे मोक्ष तुझिया नामे, देशी ऐसे दान काम-क्रोध-माया भुलवी, मन धाव घेई आशा-निराशेचे फेरे जगी ठायीठायी आहे तूच अंतर्ज्ञानी, तुला सर्व जाण बंधु-माय-बापा लागे आस दर्शनाची दत्ता म्हणे ऐका नाथा हाक पामराची अल्प बुद्धी माझी देवा, भक्त मी रे सान