नभ उतरू आलं
नभ उतरू आलं चिंब थर्थर वलं अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. अशा वलंस राती गळा शपथा येती साता जल्माची प्रीती सरलं दिनरात. वल्या पान्यात पारा एक गगन-धरा तसा तुझा उबारा सोडून रीतभात. नगं लाघट बोलू उभं आभाळ झेलू गाठ बांधला शालूऽ तुझ्याच पदरात.