नाच रे मोरा अंब्याच्या
नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ! ढगांशी वारा झुंजला रे काळाकाळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलव पिसारा नाच ! झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ करुन पुकारा नाच ! थेंब थेंब तळ्यांत नाचती रे टपटप पानांत वाजती रे पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत निळ्या सवंगड्या नाच ! पावसाची रिमझिम थांबली रे तुझीमाझी जोडी जमली रे आभाळात छान छान सातरंगी कमान कमानीखाली त्या नाच !