नच सुंदरि करूं कोपा । मजवरि धरि अनुकंपा । रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥ नारी मज बहु असती । परि प्रीती तुजवरतीं । जाणसि हें तूं चित्तीं । मग कां ही अशि रीती । करिं मी कोठें वसती । तरि तव मूर्ती दिसती । प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥ करपाशीं या तनुला । बांधुनि करि शिक्षेला । धरुनीयां केशांला । दंतव्रण करि गाला । कुचभल्ली वक्षाला । टोंचुनि दुखवीं मजला । हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा ॥