नाचती ओठावरी हे बोल वेड्या प्रीतिचे ऐकुनी घेणे न घेणे, ते तुझ्या स्वाधीनचे प्रेम माझे का कसे हे मी किती वर्णायचे प्रेम तू दावी न दावी, ते तुझ्या स्वाधीनचे प्राणपुष्पांचाच झेला मी तुझ्या हाती दिला झेलणे लाथाडणे वा, ते तुझ्या स्वाधीनचे गुंगलेल्या या जिवाला प्रीतिचे गाणे रुचे साथ देणे की न देणे, ते तुझ्या स्वाधीनचे