PrintSource

​नाचुनी तुझ्यापुढे मागते

Nachuni Tujhyapudhe Magate

ग. दि. माडगूळकर

​नाचुनी तुझ्यापुढे मागते मुशाहिरा
प्रीतभाव जाणिशी तूच प्रीत-शाहिरा

धुंद मी कलावती मी कुणा न मोजिले
ठाकता तुझ्यापुढे का उगाची लाजले
पापण्या जडावती, सूर होई कापरा

जाणकार तू सख्या नामवंत पारखी
सांगणेच संपले, सांगू काय आणखी
सद्गुणात कोंदणी बैसवी तुझ्या हिरा