नाही गडे कुणाशी माझे जगात नाते पाऊलवाट माझी दारी तुझ्याच येते ! नाही म्हणू नको ग, उघडी सखी कवाडा दारी उभा कधीचा मी एक प्रेमवेडा ! झिडकारिले कितीदा पीडा फिरून आली माझा गुन्हा असे हा, फिर्याद मीच केली कर न्यायदेवते तू येऊनिया निवाडा ! बंधाविना सुटेना ही खोड जन्मजात भोगीन मी सजा ती तव दृष्टिच्या गजांत होता सजा हवी ती, हा संपला बखेडा ! दावी दया जराशी, मजसी कधी न सोडी घालून ठेव पायी भरघोस लग्नबेडी आणि पुन्हा कधी तू उघडू नको कवाडा !