PrintSource

नको मारूस हाक

Nako Marus Haak

ग. दि. माडगूळकर

नको मारूस हाक
मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करशी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा

द्वाड सासरचा गाव
माझं जाईल नाव
तू माहेरचा मैतर जुना

का रे भरतोस शीळ
पडे काळजास पीळ
गुज कळेल सार्‍या जना

नको धरूस राग
जरा समजून वाग
तुझ्या डोळ्यांत अवखळपणा

लाख लोकांचा हाट
नको अडवूस वाट
धर आवरून आपल्या मना