Back
Fitting…

1 page

नको वळुन बघू माघारी

नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी

तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची

तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी

नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतील वरती, रत्‍नं सुंदर किती
त्यामध्ये नाही तुझी राणी पाहुनी, होशिल खिन्‍न मनी

तशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रंही तुला हेरुनी
डोळे मोडुनी नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे
आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी