नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥ रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥ चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥ सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥ नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू । करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥