नमिला गणपति माउली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविले । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करोनी रंका धरीं हातीं ॥३॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूच कृपासिंधु गणराया ॥४॥